‘मी स्वतः बीड जिल्ह्याचे…’, पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Dhananjay Munde on Guardian Minister Post: राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपद कोणत्या नेत्यांना मिळणार यावर चर्चा सुरू होती. अखेर आता पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे.
तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ठाणे जिल्हा आणि अजित पवार यांच्याकडे बीडसह पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंकत्र्यांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलेलं आहे. पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी स्वतः कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिद नको अशी विनंती केली होती, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, तसेच खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. तसेच, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देऊ नये, अशी मागणीही सातत्याने केली जात होती. त्यातच आता त्यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड… pic.twitter.com/03SR9zzMXT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2025
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे. यावर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.’, असे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.
सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.
कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ?
1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. ठाणे – एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे
4. पुणे – अजित पवार
5. बीड – अजित पवार
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
25.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
35. वर्धा – पंकज भोयर
36.परभणी – मेघना बोर्डिकर





