स्टेट बँक ऑफ इंडिया नेवासा शाखेत मिनी लायब्ररी सुरू

नेवासा : जागतिक पुस्तक दिनानिमित्त शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या नेवासा शाखेने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेवासा शाखेत ग्राहकांसाठी मिनी लायब्ररी सुरू केली. शब्दगंधचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. किशोर धनवटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन बँकेच्या शाखेत झाले.
यावेळी डॉ. करणसिंह घुले, अरुण देशपांडे, डॉ. संजय सुकाळकर, शाखाधिकारी रणजित नाळे, सुधीर चव्हाण, सुभाष पाटील बर्डे, शामभाऊ बेहळे उपस्थित होते.
शाखाधिकारी रणजित नाळे यांनी स्वागत करताना सांगितले की, ग्राहकांना प्रतीक्षेदरम्यान वाचनाची संधी देणारी ही लायब्ररी वाचन संस्कृती वाढवण्यास उपयुक्त ठरेल. डॉ. धनवटे यांनी सांगितले की, बँकेत प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना या लायब्ररीमुळे वाचनाची गोडी लागेल.
डॉ. करणसिंह घुले यांनी शब्दगंधच्या फिरत्या वाचनालयासह या उपक्रमाचे कौतुक करत वाचन चळवळीला बळ देण्याची ग्वाही दिली. डॉ. सुकाळकर यांनी जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास सांगून पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. बँकेचे कर्मचारी राकेश कुकूटळा, विनोद चव्हाण, ग्राहक उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.





