Mimi Chakraborty : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन; FIR दाखल
Mimi Chakraborty:

Mimi Chakraborty : प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि माजी तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती यांच्यासोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी कार्यक्रम आयोजकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.
रविवारी उत्तर 24 परगणा येथील बोनगाव येथे एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान त्यांची छेड काढल्याचा आणि गैरवर्तणुक केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. मिमी चक्रवर्ती यांनी ही घटना सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिमी चक्रवर्ती यांच्या तक्रारीनुसार, आयोजकांपैकी एक तन्मय शास्त्री नावाचा व्यक्ती अचानक स्टेजवर चढला आणि जबरदस्तीने अभिनेत्रीचा परफॉर्मन्स थांबवला. यानंतर, मध्यरात्री त्याने अभिनेत्रीला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. या वर्तनामुळे अपमानित झाल्यासारखे वाटल्याचे मिमी यांनी सांगितले.
मिमी चक्रवर्ती यांनी यासंबंधित ईमेलद्वारे बोनगाव पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली. हा कार्यक्रम नया गोपालगंज युवक संघ क्लब यांनी आयोजित केला होता. मिमी यांनी क्लबच्या पदाधिकारी तन्मय शास्त्री यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
मात्र कार्यक्रमाचे आयोजक युवक संघ क्लबने मिमीचे सर्व आरोप खोटे असल्याचे फेटाळून लावले. त्यांचा दावा आहे की, मिमी नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक तास उशिरा आली.
View this post on Instagram
तन्मय शास्त्री म्हणाले, “पोलिसांनी आम्हाला फक्त मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी परवानगी दिली. मिमी स्वतः एक तासापेक्षा जास्त उशिरा आली. आम्हाला माहित आहे की ती एक मोठी स्टार आहे, परंतु जर आम्ही मध्यरात्रीनंतरही कार्यक्रम सुरू ठेवला असता तर पोलिसांनी येऊन तो बंद केला असता आणि आमच्यावर कायदेशीर कारवाई केली असती. पण जर मिमी यांना एक महिला आणि एक प्रसिद्ध स्टार म्हणून थोडे जरी कार्यक्रमात अस्वस्थ वाटले असेल तर आम्ही त्यांची माफी मागतो.”
दरम्यान, मिमी बंगाली चित्रपटांसोबतच राजकारणातही सक्रिय होत्या. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून पश्चिम बंगालच्या जादवपूर मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले होते. २०१९ मध्ये अभिनेत्रीने भाजपाचे अनुपम हजरा यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, २०२४ मध्ये मिमी यांनी अचानक पक्षातून राजीनामा दिला. Mimi Chakraborty :
मिमी चक्रवर्ती यांचे नाव अवैध सट्टेबाजी अॅपच्या तपासातही समोर आले होते. २०२५ मध्ये ईडीने अभिनेत्रीला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. दरम्यान, मिमीचा ‘क्वीन्स’ नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर मेकर्सनी जारी केले असून, त्यात मिमी यांच्या हातात बंदूक दिसत आहे. चित्रपटाच्या रिलीज डेट आणि ट्रेलरबाबत लवकरच अधिक माहिती समोर येईल. Mimi Chakraborty :
दरम्यान, याआधी प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयसोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मिमी चक्रवर्ती यांच्यासोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. Mimi Chakraborty :
हेही वाचा:





