Mimi Chakraborty : सुजलेला चेहरा आणि ओठावर दुखापत अभिनेत्री मिमी चक्रवर्तीचा फोटो पाहून चाहते चिंतेत
Mimi Chakraborty : मिमी चक्रवर्ती बंगाली मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री

Mimi Chakraborty : बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर चाहत्यांकडून तिची काळजी व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत असून ओठांवर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करत तिने घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे, त्यानंतर चाहते कमेंट्स करून ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.
एका फोटोमध्ये तिचे गाल सुजलेले आणि ओठावर दुखापत दिसत आहे, तर दुसऱ्या एका फोटोत पायाला दुखापत झाल्याचे दिसत आहे. हे फोटो पाहून ‘नेमकं काय घडलं?’ असा प्रश्न सर्वजण विचारू लागले आहेत. अभिनेत्रीच्या ओठांवर थोडीशी जखमही दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या शरीरावर सूज का आली, याचे कारण स्पष्ट केले.
फोटो शेअर करताना मिमी चक्रवर्तीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक दात काढला आहे. त्यामुळे गाल सुजलेला आहे. काही टाके पडले आहेत. ओठावर जखम आहे. पायात गोळे येत आहेत. विस्कटलेले केस, विना-मेकअपचा चेहरा, कॉफी आणि माझा कुत्रा.’
View this post on Instagram
“कॅमेऱ्याच्या मागे कोणतीही ग्लॅमर टीम नाही. एका सामान्य माणसाच्या आयुष्यातील अत्यंत सामान्य आठवडा. कदाचित आपण ऑनलाइन ‘परफेक्ट’ दिसण्याला इतकं सामान्य बनवून टाकले आहे की, खरं रूप दाखवायला धाडस लागतं, असं काहीसं वाटतं. पण प्रत्यक्षात ‘नॅचरल’ दिसणेसुद्धा खूप कूल आहे.”
मिमीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. एका युझरने लिहिले, “स्वतःची काळजी घे” दुसऱ्याने लिहिले, “लवकर बरी हो, तुझ्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.”
मिमी चक्रवर्ती बंगाली मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती टीएमसीची खासदारही राहिली आहे. मात्र फेब्रुवारी २०२४ मध्ये मिमीने राजकारण सोडून पक्षाकडे राजीनामा सोपवला होता.
Crime News : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तडीपार गुन्हेगाराला अटक





