Crime News : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तडीपार गुन्हेगाराला अटक
Crime News : त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवलदार संजू जाधव, जनार्दन शेळके, राजू मोमीन, सागर धुमाळ यांनी सदर ठिकाणी जात हुडको कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ अजीम पटेल याला ताब्यात घेतले.

शिक्रापूर : शिरूर शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यामध्ये येण्यास बंदी असताना देखील सदर गुन्हेगार हा शिरूर शहरात आलेला असताना त्याला ताब्यात घेत अटक करण्यात शिरुर पोलिसांच्या पथकाला यश आले असून अजीम बशीर पटेल असे सदर तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.
शिरूर शहरातील अजीम पटेल यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपार असताना देखील न्यायालयाची कोणतीही परवानगी न घेता अजीम पटेल हा शिरूर शहरातील हुडको कॉलनी परिसरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवलदार संजू जाधव, जनार्दन शेळके, राजू मोमीन, सागर धुमाळ यांनी सदर ठिकाणी जात हुडको कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ अजीम पटेल याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडे शहरात येण्याबाबत न्यायालयाची कोणतीही परवानगी नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीस हवलदार संजय ज्ञानदेव जाधव रा. शिरुर ता. शिरुर जि. जि पुणे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजीम बशीर पटेल (वय ४० वर्षे, रा. हुडको कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश साबळे हे करत आहे.





