ममतांनी बोलविलेल्या बैठकीसाठी एमआयएमला निमंत्रण नाही; ओवैसी म्हणतात…
Updated On:

हैदराबाद – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीविषयी एकत्रितपणे निर्णय घेण्यासाठी तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीला एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. आज एका वृत्तसंस्थेशी बोलताना ओवैसी म्हणाले की मला निमंत्रण नाही.
आणि जरी मला या बैठकीला निमंत्रण दिले गेले असले तरी मी तिकडे गेलो नसतो कारण त्या बैठकीत कॉंग्रेसची उपस्थिती असणार आहे. ती मला मान्य नाही. 19 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात येत आहे.
तसेच आठ बिगर कॉंग्रेस मुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला तेलंगणा राष्ट्रीय समिती आणि आम आदमी पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित राहण्याची शक्यता नाही असे सांगण्यात येत आहे.





