Milk Prices Hike : अमूल दूध महागले.! नवे दर 14 मे पासून संपूर्ण देशभरात लागू होणार
दूध उत्पादन आणि वितरणाच्या खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Milk Prices Hike – सध्या देशात महागाई पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम या महागाईवर झाला आहे. त्यात महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.
देशातील आघाडीची दुग्ध उत्पादक कंपनी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. अमूलने प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ उद्यापासून, म्हणजेच 14 मे पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, ही दरवाढ अमूलच्या सर्व प्रकारच्या दुधावर लागू असेल. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल ताझा, अमूल शक्ती, टी-स्पेशल, स्लिम अँड ट्रिम आणि गाईच्या दुधाचा समावेश आहे.
या निर्णयामुळे आता ग्राहकांना प्रत्येक लिटरमागे 2 रुपये जादा मोजावे लागतील. दूध उत्पादन आणि वितरणाच्या खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.





