The Kerala Story 2 Box Office : विपुल अमृतलाल शाह यांचा “द केरळ स्टोरी २” हा चित्रपट मोठ्या वादानंतर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावर कडाडून टीका सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण थेट केरळ उच्च न्यायालयात पोहोचले. सुरुवातीला एका खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने एकल खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, चित्रपटाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सौम्य प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. “द केरळ स्टोरी २” चित्रपट २७ फेब्रुवारी या दिवशी प्रदर्शित झाला. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ७.५ लाख रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळाला. अंदाजे ४.६५ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली. त्यामुळे केवळ दोन दिवसांत “द केरळ स्टोरी २” चित्रपटाने एकूण ५.४० कोटी कमावले आहेत. “द केरळ स्टोरी २” हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या “द केरळ स्टोरी” चा सिक्वेल आहे. असे असले तरी दुसऱ्या भागाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. पहिल्या चित्रपटात तीन तरुणींची कथा सांगितली गेली होती. ज्यांना धार्मिक धर्मांतरासाठी प्रलोभन दाखवले जाते आणि नंतर दहशतवादी संघटना आयसिसमध्ये सामील होण्यास भाग पाडले जाते. दुसऱ्या भागात ही कथा एका कटाचा भाग म्हणून धार्मिक धर्मांतरावर आधारित आहे. सुदीप्तो सेनने यांनी पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले आहे. तर “द केरळ स्टोरी 2” चे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या ओझा, उल्का गुप्ता, आदिती भाटिया, पूर्वा पराग, सुमित गहलावत, अर्जन सिंग, युक्तम आणि अलका अमीन या नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अमरनाथ झा यांच्यासोबत कथा लिहिली आहे. हेही वाचा : Indian actor video : भयानक परिस्थिती! दुबईत भारतीय अभिनेत्याच्या घरावरून गेलं मिसाईल; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल