Indian actor video : इराणवर सुरू असलेल्या हवाई हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, याचा मोठा फटका भारतीयांना बसला आहे. हराणवर होत असलेल्या हलाई हल्ल्याची झळ दुबईला देखील बसली आहे. दुबईमधून भारताकडे आणि भारताकडून दुबईकडे जाणाऱ्या विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. बॅालीवूड अभिनेत्री सोनल चौहान हिने एक्सवरून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. अशातच आता दुबईमध्ये असलेल्या एका भारतीय अभिनेत्याने धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेता विष्णू याने त्याच्या घराजवळच मिसाईल दिसले. मिसाईच्या आवाजांनी त्याचे संपूर्ण घर हादरले आहे. हाच व्हिडिओ अभिनेत्याने त्याच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हवेत फेकले जाणारे मिसाईल दिसत असल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे. ट्वीटमध्ये अभिनेत्याने कुटुंब खूप घाबरलेले असल्याचे देखील सांगितले आहे. In Dubai visiting family tonight. Missiles visible in the sky. The loud interceptions shook our home and frightened little Ayra. Praying for peace. No child anywhere should grow up hearing the sound of war above their roof. Grateful to the UAE defense forces for keeping… pic.twitter.com/tCbE78eoBY — Vishnu Manchu (@iVishnuManchu) February 28, 2026 ट्वीटमध्ये अभिनेत्याने काय म्हटले आहे? “मी दुबईमध्ये कुटुंबाला भेटायला आलो आहे. मला आकाशात मिसाईल्स स्पष्ट दिसत आहेत. मोठ्या स्फोटांनी आमचं घर हादरलं आणि लहान आयरा घाबरली. मी शांतीसाठी प्रार्थना करतो. कोणत्याही मुलावर अशी वेळ येऊ नये की त्याला त्याच्या छतावरून युद्धाचा आवाज ऐकत मोठं व्हावं लागेल” अशी भयानक परिस्थिती त्याने व्हिडिओ शेअर करत सांगितली आहे. तसेच पोस्टमध्ये अभिनेत्याने नागरिकांचे रक्षण केल्याबद्दल यूएईच्या सैन्याचे आभारही मानले आहे. अभिनेता विष्णू हा तेलुगू कलाकार आहे. तो दुबईत त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला होता. मात्र, अचानक अमेरिका आणि इस्राईल यांनी संयुक्तरित्या इराणवर हलाई हल्ला केला. त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हेही वाचा : Mamta Kulkarni : ममता कुलकर्णीचे 25 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘या’ कॉमेडी शोमध्ये करणार काम