एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टेम्पोचालकास लुटून एक लाख 66 हजार रुपये लांबविले 

नगर – नगर औरंगाबाद महामार्गावर इमापुर येथे जाणाऱ्या टेम्पो चालकास मारहाण करुण, 1 लाख 66 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्‍वर कैलास कदम (रा. बीड, हल्ली रा. औरंगाबाद) हे टेम्पो (क्र. एमएच 20. डी. 4855) घेऊन नगर-औरंगाबाद रस्त्याने जात होते. इमामपूर शिवारातील भारत पेट्रोल पंपाजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेम्पोची काच फोडून टेम्पो च्या केबिनमध्ये घुसले. कदम यांच्या पाठीत विळ्यासारखे हत्यार मारून जखमी केले. त्यानंतर ड्रायव्हरच्या पाठीमागे असलेली 1 लाख 66 हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ईश्‍वर कदम यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात व्यक्तीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आदींनी घटनास्थळी जाऊन भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)