MI vs LSG : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! IPL मध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

MI vs LSG Suryakumar Yadav Breaks IPL Records with Fastest 4000 Runs : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एक मोठा विक्रम रचला आहे. त्याने रोहित शर्मा, सुरेश रैना आणि विराट कोहली सारख्या आयपीएल दिग्गजांना मागे टाकले आहे. खरं तर, सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये (चेंडूंच्या बाबतीत) सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे.
सूर्यकुमार यादवने रचला इतिहास –
याशिवाय, तो आयपीएलमध्ये (बॉलच्या बाबतीत) सर्वात जलद ४००० धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याच्या पुढे फक्त एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल आहेत. एलएसजी विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी, स्कायला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त ३३ धावांची आवश्यकता होती. सूर्याने १४ व्या षटकात अवेश खानच्या शॉर्ट थर्डवर चौकार मारून आपल्या ४००० धावा पूर्ण केल्या.
यासह, सूर्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे आणि आयपीएलमध्ये चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद ४००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे.
𝙏𝙝𝙚 𝙎𝙠𝙮 𝙞𝙨 𝙡𝙞𝙢𝙞𝙩𝙡𝙚𝙨𝙨 🤩
4️⃣0️⃣0️⃣0️⃣ #TATAIPL runs and counting for Surya Kumar Yadav 🫡
Predict his final score tonight ✍
Updates ▶ https://t.co/R9Pol9Id6m #MIvLSG | @surya_14kumar pic.twitter.com/SB26ncg6CD
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
आयपीएलमध्ये सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करणारे खेळाडू (चेंडूंच्या बाबतीत)
- २६५८ चेंडू – एबी डिव्हिलियर्स
- २६५८ चेंडू – ख्रिस गेल
- २७१४ चेंडू – सूर्यकुमार यादव
- २८०९ चेंडू – डेव्हिड वॉर्नर
- २८८१ चेंडू – सुरेश रैना
हेही वाचा – DC vs RCB : “ये तू खेळ ना, मजाक करु नको…”, RCBच्या प्रशिक्षकाने DCच्या कर्णधाराला फटकारले
सूर्यकुमार ४००० धावा करणाऱ्या भारतीयांच्या लांबलचक यादीत सामील झाला आहे. हा टप्पा गाठणारा तो १२ वा भारतीय आहे. या यादीत विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी आणि सुरेश रैना सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर सूर्याने अर्धशतकही ठोकले. सूर्याने १९२.८६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. ज्यामुळे मुंबई इंडियन्सला एलएसजीविरुद्ध २१५ धावांचा डोंगर उभारला.
सूर्यकुमार यादवने आणखी एक खास कामगिरी केली –
एलएसजी विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने आणखी एक कामगिरी केली. सूर्याने आयपीएलमध्ये १५० षटकार पूर्ण केले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो १३ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. एलएसजी विरुद्धच्या सामन्यापूर्वी, सूर्यकुमारला १५० षटकार मारण्यासाठी फक्त एका षटकाराची आवश्यकता होती.





