MI vs KKR : रोहित-रिकल्टनच्या जोरावर मुंबईचा ऐतिहासिक विजय! १४ वर्षानंतर सलामीच्या सामन्यात मारली बाजी
MI vs KKR : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ४ बाद २२० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने ४ गडी गमावून १९.१ षटकात सामना जिंकला.

MI vs KKR Mumbai Indian beat Kolkata Knight Riders : आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली आहे. या विजयासह मुंबई इंडियन्स तब्बल १४ वर्षानंतर सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. यापूर्वी २०१२ च्या हंगामात मुंबई आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवला होता, त्यानंतर यंदा त्यांनी विजयाने हंगामाची सुरुवात केली आहे. या सामन्यात मुंबईसाठी रायन-रिकेल्टनसह शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, केकेआरने फिन ॲलन आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोरावर धडाकेबाज सुरुवात केली, ज्यांनी ५.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. ॲलन १७ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांसह ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि ग्रीन यांनी २१ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या १०९ असताना ग्रीन १० चेंडूंमध्ये १८ धावा करून बाद झाला.
Sealed in style 🔒@mipaltan begin their #TATAIPL 2026 campaign with an impressive 6⃣-wicket victory at home 💙
Scorecard ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/zOnWb5Sc8U
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
मुंबईकडून शार्दुल ठाकूरने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स –
त्यानंतर रहाणेने अंगक्रिश रघुवंशीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावा जोडून संघाची धावसंख्या १४५ पर्यंत पोहोचवली. रहाणे तिसऱ्या विकेटच्या रुपाने बाद झाला, त्याने ४० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांसह शानदार ६७ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर, रघुवंशी आणि रिंकू सिंग यांनी डाव सावरला आणि ३० चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ६० धावा जोडून संघाची धावसंख्या २०५ पर्यंत पोहोचवली. या धावसंख्येवर रघुवंशी चौथ्या विकेटसाठी बाद झाला. त्याने २९ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांसह ५१ धावा केल्या होत्या. रिंकू सिंग चार चौकारांसह २१ चेंडूंमध्ये ३३ धावांवर नाबाद राहिला, तर रमणदीप सिंग चार धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
रोहित-रिक्ल्टनने पहिल्या विकेटसाठी साकारली विक्रमी भागीदारी –
5⃣0⃣ for Ryan Rickelton 👌
1⃣0⃣0⃣-run opening stand sealed 🤝@mipaltan cruising in the run chase at 110/0 after 9 overs! 💪Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/4GybcAdbx1
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्ससाठी लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या दोघांनी मिळून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली. ज्यामुळे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. रोहित आणि रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची सलामीची भागीदारी केली, जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सची तिसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली. रोहित शर्मा ३८ चेंडूंमध्ये ७८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर रायन रिकल्टनने ८१ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने १९.१ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. केकेआरकडून वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.





