Mystery Couple Proposal : वानखेडेवर रंगली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! MIच्या चाहत्याने KKRच्या गर्लफ्रेंडला केलं फिल्मी स्टाईल प्रपोज, पाहा VIDEO
Mystery Couple Proposal : एमआय विरुद्ध केकेआर सामन्यात स्टँडमध्ये एका 'मिस्ट्री कपल'ची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mystery Couple Proposal in IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या मैदानावर केवळ चौकार-षटकारांचीच आतषबाजी होत नाहीये, तर प्रेक्षक गॅलरीत प्रेमाचे रंगही उधळले जात आहेत. एमआय आणि केकेआर यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान स्टँडमध्ये एका ‘मिस्ट्री कपल’ची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आयपीएलच्या सामन्यांमध्ये अनेकदा ‘मिस्ट्री गर्ल’ची चर्चा होते, पण यंदा एका ‘मिस्ट्री कपल’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेला एक तरुण आणि कोलकाता नाईट रायडर्सला सपोर्ट करणारी एक तरुणी यांच्यातील हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे, केकेआर अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून या जोडीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्याला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे.
अंगठी हरवली, पण मनं जुळली!
View this post on Instagram
या २४ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक थरारक आणि तितकाच गोड प्रसंग पाहायला मिळतो. मुंबईचा चाहता आपल्या केकेआर फॅन असलेल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसला. मात्र, ऐनवेळी त्याच्या हातातील अंगठी खाली पडली आणि गोंधळ उडाला. हे पाहून आजूबाजूला बसलेले इतर क्रिकेट चाहतेही मदतीला धावले. सर्वांनी मिळून ती अंगठी शोधली आणि अखेर त्या तरुणाने आपल्या प्रेयसीला अंगठी घालत ‘फिल्मी स्टाईल’ प्रपोज केले. तरुणीने ‘हो’ म्हणताच दोघांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस –
हे मिस्ट्री कपल नेमके कोण आहे आणि त्यांचे नाव काय, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी, त्यांच्या या अनोख्या प्रपोजने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. “संघ वेगवेगळे असले तरी मनं मात्र एकच आहेत,” अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत. यापूर्वीही अनेकदा स्टेडियमवर प्रपोज करण्याचे प्रकार घडले आहेत, पण ‘अंगठी शोधण्यापासून ते मिठी मारण्यापर्यंत’चा हा प्रवास चाहत्यांना अधिक भावला आहे.
मैदानात मुंबईने विजय मिळवला असला, तरी सोशल मीडियावर मात्र या ‘प्रेमाच्या जोडी’चीच चर्चा रंगली आहे.





