Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरला पंचांशी वाद घालणे पडले महागात! केली मोठी कारवाई

MI Captain Harmanpreet Kaur fined in WPL 2025 : महिला प्रीमियर लीग २०२५ मधील १६ वा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्सने टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे, परंतु सामन्यानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरवर कारवाई करण्यात आली आहे. खरंतर, सामन्यादरम्यान हरमनप्रीत यूपी वॉरियर्सच्या एका खेळाडूशी वाद घालताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
पंचांशी वाद घालणे पडले महागात –
सामन्यादरम्यान, हरमनप्रीत कौरचा यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोनशी वाद झाला. यादरम्यान हरमनप्रीत सोफीकडे बोट दाखवतानाही दिसली. यानंतर पंचांनी हस्तक्षेप केला. यानंतर हरमनप्रीतला राग आला आणि तिने पंचांशी वादही घातला. पंचांशी वाद घातल्याबद्दल आणि त्यांचे म्हणणे न ऐकल्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर कारवाई करण्यात आली आहे.
Heated moment between HarmanpreetKaur and Eccelstone in WPL.pic.twitter.com/s5am45ppsc
— Don Cricket 🏏 (@doncricket_) March 7, 2025
हरमनप्रीत कौरने कलम २.८ अंतर्गत तिचा गुन्हा कबूल केला आहे. पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याच्या लेव्हल १ च्या गुन्ह्यांमध्ये, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम असतो. आता हरमनप्रीत कौरला तिच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
🚨 Mumbai Indians captain Harmanpreet Kaur has been reprimanded and fined 10% of her match fees for Level 1 offence of showing dissent at an umpire’s decision.#WPL2025 pic.twitter.com/7FVm1fFJW9
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 7, 2025
मुंबई इंडियन्सने मारली बाजी –
या सामन्यात, यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १५० धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने १८.३ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात मुंबईकडून हेली मॅथ्यूजने ४६ चेंडूत ६८ धावांची खेळी साकारली. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईने प्लेऑफच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे.





