Mexico News : मेक्सिकोतल्या शाळांमध्ये सेलफोन वापरण्यावर बंदी
मेक्सिकोतील (Mexico News) शाळांमध्ये वर्गात सेलफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थी आणि किशोरवयीनांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा होत असलेला वापर कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.

Mexico News : मेक्सिकोतील (Mexico News) शाळांमध्ये वर्गात सेलफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थी आणि किशोरवयीनांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा होत असलेला वापर कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. या निर्बंधांना मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरात घट झाल्यामुळे किशोरवयीन मुलांच्या एकाग्रतेमध्ये सुधारणा होईल, तणाव आणि अस्वस्थताही कमी व्हायला मदत होईल, असे तज्ज्ञांचे (Mexico News) मत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मना द्वेषपूर्ण भाषण, शिवीगाळ, लैंगिक हिंसा, छळ, सायबरबुलिंग आणि इतर बेकायदेशीर मजकूर असलेल्या पोस्ट काढून टाकणे बंधनकारक असेल, असे नियम या महिन्यात लागू करण्याची तयारी मेक्सिकोतील अधिकारी करत आहेत.






