Earthquake in Mexico : मध्यरात्री भूकंपाने मेक्सिको हादरले; 7.3 मॅग्निट्युडच्या धक्क्याने नागरिकांमध्ये घबराट
मेक्सिकोच्या (Earthquake in Mexico) दक्षिण किनारपट्टीच्या भागाला शुक्रवारी रात्री ७.३ मॅग्निट्युड इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा हा धक्का मेक्सिको सिटीपासून एल साल्वाडोर पर्यंतच्या भागात जाणवला.

Earthquake in Mexico : मेक्सिकोच्या (Earthquake in Mexico) दक्षिण किनारपट्टीच्या भागाला शुक्रवारी रात्री ७.३ मॅग्निट्युड इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा हा धक्का मेक्सिको सिटीपासून एल साल्वाडोर पर्यंतच्या भागात जाणवला. मात्र या भूकंपामुळे कोठेही मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त आतापर्यंत मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू ऍक्वेलेस सेर्दानच्या नैऋत्येला ४८ किलोमीटर अंतरावर चिपालास किनारपट्टीजवळ आणि जमिनीखाली १५ किलोमीटरवर होता, असे यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. मेक्सिको (Earthquake in Mexico) आणि ग्वाटेमालाच्या सीमाभागातून वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरील सुचियात शहराच्या परिसरात त्सुनामी लाटा येण्याच्या धोक्याबाबत देखरेख केली जाते आहे, असे या शहराचे महापौक एस्मेर वाझकाएझ गालार्डो यांनी सांगितले.तापाचुला या मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीजवळील शहराला सर्वप्रथम भूकंपाचे हादरे बसायला सुरुवात झाली. मात्र नंतर या हादऱ्यांचे प्रमाण वाढत गेले.
शेजारच्या ग्वांटेमालामधील ग्वाटेमाला सिटीमध्येही भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कारण हे धक्के जरा जास्त वेळासाठी जाणवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपामुळे घाबरलेले लोक रस्त्यांवर धावले होते.
मेक्सिको सिटीमधील (Earthquake in Mexico) काही भागातल्या इमारतींना तडे गेले आणि भूकंपामुळे या इमारती हादरल्या. भूकंपाच्या प्राथमिक धक्क्यांचे प्रमाण अत्यंत सौम्य होते. त्यामुळे भूकंपाचा इशारा देणाऱ्या प्रणालीने या भूकंपाची दखल घेतली नव्हती, असे स्पष्टिकरण सरकारच्यावतीने देण्यात आले.






