FIFA World Cup Awards: मेस्सीचे ‘बॅक-टू-बॅक’ वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अधुरे; तब्बल १६ वर्षांनंतर स्पेन ठरला चॅम्पियन
FIFA World Cup Awards: फ्रान्सचा किलियन एम्बापे ठरला ‘गोल्डन बूट’चा मानकरी

FIFA World Cup Awards: फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात फेरान टोरेसने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० ने हरवून तब्बल १६ वर्षांनंतर विजेतेपदावर नाव कोरले. 2010 नंतर स्पेनचे हे दुसरे विश्वविजेतेपद ठरले.
न्यूयॉर्क-न्यू जर्सीतील मेटलाइफ स्टेडियमवर झालेल्या या महासंग्रामात यमाल, ॲलेक्स बाएना, फेरान टोरेस, पेड्री यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अप्रतिमरित्या त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
अखेरीस अतिरिक्त वेळेतीतल ब्रेकनंतर पुढच्याच मिनिटाला निको विल्यम्सच्या पासवर फेरान टोरेसने जबरदस्त गोल नोंदवला आणि स्पेनच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यासह मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न भंगले. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, मात्र स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांना एकही गोल करता आला नाही.
दोन्ही संघांचे गोलरक्षक आणि बचावपटू अफलातून खेळल्याने 90 मिनिटांनंतर स्कोअर 0-0 असाच राहिला. त्यामुळे विश्वविजेता ठरवण्यासाठी सामना अतिरिक्त वेळेत गेला. त्यानंतर अतिरिक्त वेळेच्या पहिल्या 15 मिनिटांत दोन्ही संघ सावध खेळले.
थकवा जाणवत असतानाही दोन्ही बाजूंनी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने अखेर अर्जेंटिनाचा अभेद्य बचाव भेदला. वेगवान आक्रमण उभारत स्पेनने चेंडू बॉक्समध्ये पोहोचवला आणि या एका गोलने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले. 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने शानदार गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मेस्सीचे स्वप्न अधुरे
2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवणाऱ्या लिओनेल मेस्सीसमोर सलग दुसरे विश्वविजेतेपद जिंकण्याची मोठी संधी होती. हा विजय मिळाला असता अर्जेंटिना सलग दोन विश्वचषके जिंकणारा फुटबॉल इतिहासातील तिसरा देश ठरला असता. मात्र स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला एकही गोल करू दिला नाही. अखेरच्या शिट्टीनंतर मेस्सीसह अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. यावेळी मेस्सी भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.
किलियन एम्बापे गोल्डन बूटचा मानकरी
फ्रान्सचा किलियन एम्बापे सलग दुसऱ्यांदा ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला. त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दहा गोल नोंदवले. तसेच चार गोलमध्ये त्याने साह्य केले. लिओनेल मेस्सी आणि एम्बापे यांच्यात ‘गोल्डन बूट’साठी चुरस होती.
मेस्सी आणि एम्बापे यांचे प्रत्येकी आठ गोल होते. मात्र, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत एम्बापेने दोन गोल नोंदवले आणि मेस्सीला मागे टाकले. यासह मेस्सीच्या पदरी ‘गोल्डन बूट’साठी देखील निराशा पडली.
हेही वाचा:






