मेस्सी अखेर ‘पीएसजी’शी करारबद्ध
Updated On:

पॅरिस – बार्सिलोनाशी असलेला करार मोडल्यानंतर आता स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंज जर्मेन (पीएसजी) संघाशी करार केला.
हा करार होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती मात्र, हा करार कीती रकमेचा असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.
अखेर पीएसजी संघ व्यवस्थापनाने मेस्सीशी करार झाल्याचे जाहीर करतानाच हा करार तब्बल 4 कोटी 10 लाख डॉलर्स इतक्या प्रचंड रकमेचा असल्याचेही सांगितले. गेली 17 वर्षे मेस्सी बार्सिलोनाशी करारबद्ध होता.
मात्र, आता हा करार वाढवण्यावरून मेस्सी व बार्सिलोना यांच्यात एकमत न झाल्यामुळे मेस्सीने क्लब सोडण्याचा निर्णय घेतला.





