पारा 30 अंश सेल्सिअवर; शहरात ऑक्टोबर हिटची चाहुल
Updated On:

पुणे – पावसाने उघडीप दिल्याने शहरातील पारा 30 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे पुणेकर घामाघूम झाले आहेत. ऑक्टोबर हिट सप्टेंबर महिन्यातच जाणवू लागली आहे. पुढील 3 दिवस हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शहरात पावसाने रविवारपासून गुरुवारपर्यंत हजेरी लावली. हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरींमुळे वातावरणातील गारठादेखील वाढला होता. त्यामुळे तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. मात्र, गुरुवारी पावसाने हजेरी लावूनही पारा 29.4 सेल्सिअपर्यंत वाढला होता. त्यानंतर पावसाची रिमझिम थांबल्याने हवेतील आद्रतेवर परिणाम झाल्याने पारा 30 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. परतीच्या पावसाच्या प्रवासाला सुरुवात होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी असताना वातावरणात मोठे बदल होत आहेत.





