Talegaon : तळेगावातील विकासकामांच्या मंजुरीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांना निवेदन
Talegaon : १३ कोटी ५० लक्ष रुपयांची प्रस्तावित विकासकामे; आमदार शेळके, नगराध्यक्ष दाभाडे-पाटील यांनी घेतली भेट

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील १३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या प्रस्तावित विकास कामांना प्राधान्याने मंजुरी द्यावी अशा आशयाचं मागणीच निवेदन आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मुंबई येथे दिले.
यावेळी आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मावळ तालुका भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, नगरसेवक चिराग खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या विकासकामांमध्ये प्रामुख्याने समाजमंदिर बांधणे, विविध रस्त्यांचे डांबरीकरण, भूमिगत विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, उद्यान विकसित करणे, नवीन जॅकवेल, पंप हाऊस, अप्रोच बि्रज बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पंपवेल अशी विविध विकासकामे आहेत.
- मनोहर नगर येथील म्हाडा कॉलनी येथे समाजमंदिर बांधणे – ५०,०००००.
- राधानगरी जवळील रस्ते डांबरीकरण करणे -३०,०००००.
- स्वराज नगरी येथील विविध ओपन स्पेसला कंपाऊंड करणे-३०,०००००.
- पंचवटी कॉलनी येथील नाना नाणी पार्क ते भास्कर भेगडे यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे -३५,०००००.
- शाळा चौक ते राजेंद्र चौक पर्यंत अन्डर ग्राउंड विद्युतीकरण करणे – १७,०००००
- दाभाडे आळी साने आळी अन्डर ग्राउंड विद्युतीकरण करणे -१,४३,०००००
- राव कॉलनी येथील समाजमंदिर नूतनीकरण करणे -६०,०००००
- प्रभाग क्र १ येथे अंतर्गत रस्ते करणे -९०,०००००
- बेथेल सोसायटी अंतर्गत रस्ते करणे -६०,०००००
- राजगुरव कॉलनी उद्यान विकसित करणे -६२,१३,०७३
- ज्ञानेश्वर नगर मधील स्मशानभूमीत जाणारा रस्ता करणे -१,८९,००,०००
- प्रभाग क्र ८ मधील अंतर्गत रस्ते करणे -२,००,००,०००.
- मावळ लँड मोठी ओपन स्पेस विकसित करणे.-३५,००,०००
- सोमाटणे येथे नवीन जॅकवेल, पंप हाऊस व अप्रोच .िब्रज बांधकाम करणे – १,२५,०००००
- चौराई जलशुध्दीकरण केंद्र येथे नवीन पंपवेल बांधकाम करणे – १,७५,०००००





