पीएनबी घोटाळ्यातील आरोपी फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला अटक ; बेल्जियममधून भारतात आणणार

Mehul Choksi Arrested । पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीलाअखेर बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. एका इंग्रजी व्रुत्तपत्रानुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या अपीलवरून ६५ वर्षीय चोक्सीला शनिवारीटक करण्यात आली होती आणि तो अजूनही तुरुंगात आहेत.
मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. त्यादरम्यान अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. याठिकाणी तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियममध्ये ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ असल्याचे आणि तो उपचारांसाठी अँटिग्वाहून बेल्जियममध्ये आल्याचे अनेक अहवालांमध्ये उघड झाले आहे.
बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाच्या वॉरंटचा हवाला दिला Mehul Choksi Arrested ।
मेहुल चोक्सीला अटक करताना, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. अहवालात म्हटले आहे की हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते. असे म्हटले जात आहे की मेहुल चोक्सी प्रकृती बिघाड आणि इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटका मागू शकतो.
Fugitive Mehul Choksi has been arrested in Belgium: ED Sources
More details awaited pic.twitter.com/SN8e0beAMu
— ANI (@ANI) April 14, 2025
चोक्सीवर १३,५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
पीएनबीला १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली सीबीआय आणि ईडी मेहुल चोक्सीवर खटला चालवत आहेत. चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा देखील या प्रकरणात आरोपी आहे, जो लंडनमध्ये लपून बसला आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणाचीही प्रतीक्षा आहे.
मेहुल चोक्सी भारतातून कधी पळून गेला? Mehul Choksi Arrested ।
मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये त्याचा पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला. पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच हे दोघेही देश सोडून गेले होते. हा भारतातील दुसरा सर्वात मोठा बँक घोटाळा होता. हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले होते. २०२१ मध्ये, जेव्हा तो क्युबाला जात होता, तेव्हा तो डोमिनिकामध्ये पकडला गेला. यानंतर मेहुलने म्हटले होते की, राजकीय कट रचल्यामुळे हे खटले त्याच्याविरुद्ध चालवले जात आहेत. त्यांनी असेही म्हटले होते की ईडीने भारतातील त्यांच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे जप्त केल्या आहेत.





