हातावर मेहंदी अन् हिरवा चुडा…; समृद्धी केळकरच्या पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

Samruddhi Kelkar | सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार सध्या लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, शिवानी सोनार या कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री समृद्धी केळकर देखील 2025 या वर्षात बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
समृद्धीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातावर मेहेंदी आणि नव्या नवरीसारखा हिरवा चुडा भरल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत समृद्धीने “कळवते लवकरच…” असं कॅप्शन देत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. यानंतर आता समृद्धी लग्नबंधनात अडकणार का? असा सवाल केला जात आहे.
तर काहींनी समृद्धीचा हा नवा प्रोजेक्ट असल्याचा अंदाज व्यक्त करत आहे. या पोस्टद्वारे समृद्धीने हिरवा चुडा भरून नेमकी कशाची हिंट दिली याचा उलगडा ती लवकरच करणार असल्याचे म्हंटले आहे. Samruddhi Kelkar |
View this post on Instagram
दरम्यान, समृद्धी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेत दिसली होती. तर ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘मी होणार सुपरस्टार’ या शोचं तिने सूत्रसंचालनही केलं होतं. २०१७ मध्ये रिॲलिटी शो ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये झळकली होती. Samruddhi Kelkar |
हेही वाचा:
120 कोटींचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या ; मुख्य आरोपीला हैद्राबादमधून अटक





