Mehidy Miraj Hospitalized : चेंडू लागल्यानंतर झाली उल्टी, तरी बांगलादेशच्या कर्णधाराने सोडलं नाही मैदान; आता हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालं?
Mehidy Miraj Hospitalized : बांगलादेशचा कर्णधार आणि मॅचविनर मेहदी हसन मिराज याला सामना संपताच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Mehidy Hasan Miraj Hospitalized Helmet Hit Concussion : बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव करत इतिहास रचला असला, तरी या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशच्या गोटातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा कर्णधार आणि मॅचविनर मेहदी हसन मिराज याला सामना संपताच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू थेट हेलमेटवर आदळल्याने मिराजला मैदानावरच गंभीर दुखापत झाली होती.
मैदानातच उलट्या; स्ट्रेचर मागवावे लागले –
हा थरारक प्रकार बांगलादेशच्या डावातील ३४ व्या षटकात घडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस याचा एक उसळता चेंडू मिराजच्या हेलमेटवर अतिशय जोरात जाऊन लागला. हा फटका इतका भीषण होता की, मिराज जागेवरच सुन्न झाला. सावधगिरीचा उपाय म्हणून मैदानावर स्ट्रेचरही आणण्यात आले होते. मैदानातच उपचार सुरू असताना मिराजला उलट्या देखील झाल्या आणि तो प्रचंड अस्वस्थ दिसत होता. ऑस्ट्रेलियन संघाचे डॉक्टर आणि बांगलादेशचे फिजिओ बायेजीदुल इस्लाम खान यांनी मैदानावर धाव घेत त्याच्यावर प्रथमोपचार केले.
डोक्याला दुखापत असतानाही ठोकला विनिंग सिक्स –
🚨 HUGE SCARE FOR BANGLADESH! 🚨
Mehidy Hasan Miraz was initially unable to respond during a concussion check after a nasty blow in the 2nd ODI vs Australia. 😰
But the Bangladesh star showed immense grit, recovered, and stood tall for his team! 🇧🇩💪🔥#AUSvsBAN pic.twitter.com/Y56b1ewQVf
— CricInformer (@CricInformer) June 11, 2026
अशा गंभीर परिस्थितीतही कर्णधार मिराजने मैदान सोडण्यास साफ नकार दिला आणि फलंदाजी सुरू ठेवली. त्याने २२ चेंडूंत २२ धावांची झुंजार खेळी केली. ३५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिराजने शानदार षटकार ठोकून बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. सामना जिंकवून दिल्यानंतरच तो मैदानाबाहेर गेला.
टीम फिजिओने दिलेल्या माहितीनुसार, मिराजला ‘कन्कशन’ (डोक्याला गंभीर दुखापत/धक्का) झाले आहे. पुढील २४ तास त्याच्या अंतर्गत लक्षणांचे मूल्यांकन करण्यासाठी त्याला रुग्णालयात ठेवले जाईल, मात्र सध्या तो धोक्याबाबाहर आहे.
असा रंगला ऐतिहासिक सामना –
🚨 Concern for Mehidy Hasan Miraz.
After suffering a serious blow to the head, Miraz is being taken to hospital for urgent medical assessment. He also vomited on the field following the incident.
Wishing him a speedy recovery. 🙏🇧🇩#BangladeshCricket #BANvAUS pic.twitter.com/kysOi7dkwN
— Shadman Sakib Arnob (@arnuX05) June 11, 2026
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४२ षटकांत ८ बाद १८७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था सुरुवातीला ३ बाद ० आणि नंतर ६ बाद ८१ अशी केली होती. परंतु, झेव्हियर बार्टलेट (५२) आणि मार्नस लाबुशेन (५५) यांनी डाव सावरला. पावसामुळे बांगलादेशला ४१ षटकांत १९२ धावांचे सुधारित ‘DLS’ लक्ष्य मिळाले. सौम्य सरकार (४२), नजमुल शांतो (४२) आणि तौहीद ह्रदोयच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर बांगलादेशने ३५ व्या षटकातच विजय साकारला. २००५ नंतर पहिल्यांदाच बांगलादेशने द्विपक्षीय मालिकेत कांगारूंना नमवून नवा इतिहास रचला आहे.





