Mehbooba Mufti : पीडीपीच्या अध्यक्षपदी मेहबुबा मुफ्ती यांची फेरनिवड
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्या वर्ष २००२ पासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत.

Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्या वर्ष २००२ पासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. पीडीपीच्या बैठकीत मेहबुबा यांच्या फेरनिवडीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
फेरनिवडीनंतर पीडीपीच्या नेत्यांना, कायर्कर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारांवर टीकास्त्र सोडले. काश्मीरमध्ये सध्या स्तब्धता आहे. मात्र, त्या स्थितीला शांतता समजण्याची चूक करू नये, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला (Mehbooba Mufti) दिला. कुठल्याही सरकारपेक्षा राष्ट्रहित महत्वाचे आहे. संपूर्ण स्थिती सुरळीत होण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील जनतेवर विश्वास ठेवायला हवा, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.
जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला मेहबुबा यांनी आक्रमक शैलीत लक्ष्य केले. सत्ताधारी पक्ष केंद्र सरकारच्या प्रत्येक आदेशाचे पालन करत आहे. केंद्र सरकार नायब राज्यपालांच्या माध्यमातून कामकाज चालवू पाहते. मात्र, जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी निषेधाचा उसासाही टाकत नाहीत.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला अनादराची वागणूक देऊ नये. जम्मू-काश्मीरला योग्य न्याय न मिळाल्यास भाजपला राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी (Mehbooba Mufti) दिला.




