Meghalaya Honeymoon Case : मेघालय हनीमून हॉरर गूढ उलगडले; पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी

Meghalaya Honeymoon Case – इंदौरमधून हनीमूनसाठी शिलाँगला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीची हत्या झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आता त्याची पत्नीच हत्याकांडाची मास्टरमाईंड असल्याचा खुलासा झाला आहे. तिने तीन मारेकऱ्यांना सुपारी देत मेघालयात राजा रघुवंशीची हत्या केली, अशी माहिती डीजीपी आय नोंगरांग यांनी दिली.
पत्नी सोनम हिने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील नंदगंज पोलिस स्टेशनसमोर आत्मसमर्पण केले आहे, तर रात्रीच्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सोनम रघुवंशीसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन जण मध्य प्रदेशातील आणि एक आरोपी उत्तर प्रदेशातील आहे.
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह ११ दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढण्यात आला.
शिलाँग पोलिसांनी आकाश राजपूतला उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून अटक केली. तर राज कुशवाह आणि एकाला इंदौरमधून ताब्यात घेण्यात आले. तर राजा रघुवंशीची पत्नी सोनमने स्वत:च उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
बॉयफ्रेंड मॅनेजर, सोनम एचआर
सोनमचे तिच्याच फॅक्टरीतील एक कर्मचारी राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध होते. ही फॅक्टरी सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांच्या मालकीची आहे. तिथे सोनम एचआर म्हणून काम करायची. राज कुशवाह त्या फॅक्टरीत मॅनेजर म्हणून काम करायचा. सोनमसोबत त्याचे घनिष्ठ संबंध होते.
राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात ज्या लोकांना अटक केलीय, त्यात विक्की ठाकुर, आनंद आणि राज कुशवाह यांचा समावेश आहे. राजा कुशवाह या सगळ्या गुन्ह्यात मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तो सतत सोनम रघुवंशीच्या संपर्कात होता.





