Shirur : सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्यासंदर्भात बैठक संपन्न

शिरूर : महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मी बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या बांधापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांना रस्ता मिळत नाही तोपर्यंत चळवळ शांत बसणार नाही असे पवळे यांनी सांगितले. तसेच अॅड. सुप्रिया साकोरे यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले. विजय शेलार यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व रस्त्याचे महत्त्व पटवून दिले.
सरदवाडी हे गाव रोड मॉडेल व्हिलेज म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच लक्ष्मी जाधव यांनी सांगितले.
तसेच रोड मॉडेल व्हिलेज कमिटी स्थापन करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी शिरूर पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे शरद पवळे, विजय शेलार, अॅड. सुप्रिया साकोरे, सुरेश वाळके, बापूराव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिरामण सरोदे, उपाध्यक्ष कैलास सरोदे, उपसरपंच सोमनाथ सरोदे, ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे, शिल्पा घावटे, विद्या सरोदे, सुरेखा निरवणे, मोनाली कर्डिले ग्रामस्तरीय कमिटीचे पंकज शेळके, विकास सोसायटीचे संचालक किशोर सरोदे, शिरूर मंडलाधिकारी फलके साहेब, तलाठी चौधरी मॅडम, माजी सरपंच कमल सरोदे, हनुमान सरोदे आदी ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदवाडी गावचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी केले, तर आभार सरपंच लक्ष्मी बाळासाहेब जाधव यांनी मानले.





