सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या ‘गळाभेटीनं’ चर्चांना उधाण

Lok Sabha Election 2024 । आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात फिरताना दिसून आहे. त्यातच प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढाई होणार असल्याचे पाहायला मिळतंय. लोकसभा मतदार संघामधील सर्वात जास्त चर्चा होतीय ती म्हणजे बारामती लोकसभा मतरदारसंघाची. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झालंय. त्यावरूनच आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली होती.
पवार कुटूंबा विरुद्ध पवार कुटूंब अशी लढत येत्या निवडणुकीत होणार असल्याचे समजते आहे. एकीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आरोप आणि टीका करतांना दिसत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंसमोर अवघड आव्हान उभं करणार असल्याचं बोललं जात आहे. असे असतांना मात्र एक व्हिडिओने सर्वांना संभ्रमात टाकले आहे.
हा व्हिडिओ बारामतीच्या जळोचा काळेश्वर मंदिरातील आहे.या मंदिरात शुक्रवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे गेल्या होत्या. यावेळी तिथे सुनेत्रा पवारही तिथे दर्शनासाठी उपस्थित होत्या. त्यामुळे गाभाऱ्याजवळ या दोघींचा आमना-सामना झाला. आता पुढे काय होणार याची उत्सुकता तिथे उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होती. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे स्मितहास्य करत सुप्रिया सुळेंनी त्यांची गळाभेट घेतली. दोघींनी एकमेकींची आपुलकीनं विचारपूस केली. या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी गाभाऱ्यात दर्शनही घेतलं. या दोघींसाठी तो काही क्षणांचा आमना-सामना असला, तरी त्यातून बारामतीमध्ये असंख्य चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
तत्पूर्वी, सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी यावेळी ‘ मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका केली. एवढंच नाही तर ‘मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैे सुप्रिया सुळे हूं..खुद करुंगी और खुद पास हुंगी’ अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांना टोला लगावला होता अशात नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा
मनोज जरांगे यांचं लोकसभा निवडणुकीबाबत म्हणाले,’मराठे फॉर्म भरत आहे त्यांची फजिती होणार…’





