Medicine Price Hike: युद्धाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार ? सरकारने औषध दरवाढीला दिली मंजुरी ; औषधांच्या किमती का वाढवल्या?, वाचा सविस्तर
Medicine Price Hike: मध्य पूर्वेत सुरु असणाऱ्या युद्धाचे पडसाद आता हळूहळू देशावर पडताना दिसून येत आहेत. कारण देशभरात सगळ्याच्या आरोग्याशी संबंधित गोष्टीवर याचा मोठा परिणाम होणार असून याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

Medicine Price Hike: मध्य पूर्वेत सुरु असणाऱ्या युद्धाचे पडसाद आता हळूहळू देशावर पडताना दिसून येत आहेत. कारण देशभरात सगळ्याच्या आरोग्याशी संबंधित गोष्टीवर याचा मोठा परिणाम होणार असून याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
देशातील औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने २०२५ च्या घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारावर औषधांच्या किमतीत ०.६५% पर्यंत वाढ करण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे.
यानुसार, औषध कंपन्यांना आता स्वतंत्र सरकारी मंजुरीशिवाय, एका निश्चित सूत्रानुसार एमआरपी वाढवता येणार आहे. याचा अर्थ असा की, काही अत्यावश्यक औषधे थोडी महाग होऊ शकतात, कारण कंपन्यांना वार्षिक महागाईच्या आधारावर किमती वाढवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
औषधांच्या किमती का वाढवल्या जात आहेत? Medicine Price Hike:
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे (CTI) अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी यापूर्वी एक निवेदन जारी करून म्हटले होते की, जर ही वाढ सुरूच राहिली, तर दिल्लीच्या व्यापार आणि उद्योगाला ५,००० कोटी रुपयांचा व्यावसायिक फटका बसू शकतो.
भागीरथ पॅलेस येथील वैद्यकीय शस्त्रक्रिया साहित्याचे घाऊक विक्रेता मुकेश भासिन यांनी स्पष्ट केले की, प्लास्टिक ग्रॅन्युल्सच्या वाढत्या किमतींमुळे पॅकेजिंगच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम वैद्यकीय उपकरणांवरही झाला आहे.
कच्चा माल महाग, पॅकेजिंगच्या किमती वाढल्या
अनेक अत्यावश्यक कच्चा माल, रासायनिक घटक, प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम यांच्या किमती वाढल्या असून, त्याचा परिणाम औषध कंपन्यांच्या खर्चावर होत आहे. प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियमचा वापर गोळ्या आणि सिरपच्या निर्मितीमध्ये, तसेच त्यांच्या पॅकेजिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
कोणत्या औषधांच्या किमती किती वाढतील? Medicine Price Hike:
गेल्या काही दिवसांत, सामान्यतः वापरले जाणारे औषध पॅरासिटामॉलच्या कच्च्या मालाच्या किमतीत अंदाजे ४७% वाढ झाली आहे. वेदनाशामक डायक्लोफेनॅकच्या किमतीत ५४%, डायक्लोफेनॅक पोटॅशियमच्या किमतीत ३३%, अमोक्सिसिलिन ट्रायहायड्रेटच्या किमतीत ४५% आणि सिप्रोफ्लोक्सासिनच्या किमतीत अंदाजे ६०% वाढ झाली आहे.
दैनंदिन औषधोपचार आणि उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंज आणि थर्मामीटर यांसारख्या वैद्यकीय उपकरणांच्या किमतीही वाढल्या आहेत. साहजिकच, औषधांच्या किमतीतील वाढीचा सर्वसामान्य लोकांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.






