बिग बॉस जिंकताच एमसी स्टॅनचं नशीब चमकलं; शाहरुख खानच्या ‘या’ सिनेमात नशीब आजमावणार

मुंबई – बिग बॉस जिंकल्यानंतर बस्ती का हस्ती म्हणून ओळखणारा जाणारा ‘एमसी स्टॅन’ची लोकप्रियता दुप्पट झाली आहे. साडेचार महिने चाललेल्या या शोमधील एमसी स्टॅनची वेगळी शैली प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. हेच कारण होते की बिग बॉसमध्ये फारसे सक्रिय नसूनही चाहत्यांनी त्याची साथ सोडली नाही. आणि याच कारणामुळे एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
दरम्यान, घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनचं सोशल मीडियावर अजुनही कौतूक होताना दिसतंय. अश्यातच पुन्हा एकदा एमसी स्टॅन बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. गायन क्षेत्रातनंतर आता एमसी स्टॅन अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
एका प्रसिद्द वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ‘एमसी स्टॅन’ला मोठा ब्रेक मिळाला असून तो लवकरच बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटात एमसी स्टॅनचं पात्र कोणतं असणार? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एमसी स्टॅनने शाहरुख खानचा ‘इंस्टाग्राम लाइव्ह’चा सुद्धा रेकॉर्ड मोडला आहे.





