Rasika Sunil : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीचे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण; गुलाबी साडीत खुललं सौंदर्य
Rasika Sunil : रसिकाचा हा पारंपरिक आणि स्टायलिश अंदाज

Rasika Sunil : अभिनेत्री रसिका सुनील हिला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
आता लवकरच रसिका साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘GDN’ असून या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी ती खास कोईंबतूरला पोहोचली होती.
या कार्यक्रमात रसिकाने तिच्या स्टायलिश आणि एलिगंट लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी रसिकाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
View this post on Instagram
त्यासोबत तिने स्लीव्हलेस डीप नेक ब्लाऊज घातला होता. मोकळे केस, हलका मेकअप आणि आकर्षक लूक यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. रसिकाचा हा पारंपरिक आणि स्टायलिश अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला. तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
या कार्यक्रमातील काही खास फोटो रसिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत लिहिले,”GDN टीमचे मनापासून आभार! एवढ्या प्रेमळ स्वागतासाठी आणि या सुंदर फोटोंसाठी तुमचे खूप धन्यवाद. आणि आता मुख्य गोष्ट… ‘GDN’चा भव्य आणि शानदार ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. तुम्ही तो पाहिला का?”
रसिकाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल”, “खूपच सुंदर”,”मराठी इंडस्ट्रीची क्वीन”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:





