Mayor Ritu Tawde: महापौर रितू तावडेंच्या मनगटावर 1 कोटींचं घड्याळ? सोशल मीडियावर खळबळ; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग
Mayor Ritu Tawde: दरम्यान, या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Mayor Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत त्यांच्या मनगटावरील घड्याळावर विशेष लक्ष वेधण्यात आले असून, ते घड्याळ तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोणते घड्याळ आहे?
महापौर तावडे यांच्या मनगटावरील घड्याळ हे जगप्रसिद्ध रोलेक्स कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. ‘यलो गोल्ड रोलेक्स डेटोना लाईट डायल’ असे या घड्याळाचे नाव असून भारतीय बाजारभावानुसार त्याची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे. हा फोटो व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी महापौरांना लक्ष्य करत जोरदार ट्रोलिंग सुरू केले.
मोदींच्या घड्याळाशी तुलना –
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटावरील घड्याळाचाही फोटो व्हायरल झाला होता. ते घड्याळ ५० हजार रुपये किमतीचे असल्याचे सांगितले जात होते. त्यावेळी “फकिराकडे एवढे महाग घड्याळ” असे म्हणत नेटकऱ्यांनी पंतप्रधानांनाही ट्रोल केले होते.
आता रितू तावडे यांच्याकडील घड्याळाची किंमत पंतप्रधानांच्या घड्याळापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असल्याचे समजताच, “महापौरांकडे पंतप्रधानांपेक्षाही महाग घड्याळ” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

