Maval News : आमदार सुनील शेळकेंच्या हस्ते तळेगावात विकासकामांचे भूमिपूजन ; ‘या’ भागांना होणार फायदा

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार बांधकामाच्या कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि.१२) करण्यात आले.प्रसंगी माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, सुरेश चौधरी, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, माजी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, दिलीप खळदे, रामभाऊ गवारे, महेंद्र पळसे, करुणा सरोदे, संगीता खळदे, बंटी टकले, संकेत खळदे, कुणाल पवार, संग्राम जगताप, अनिल चौधरी, अक्षय खळदे, बाळासाहेब शेडगे, गोकूळ किरवेंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या अंतर्गत संभाजीनगर रस्ता काँक्रीटीकरण, निळकंठ नगर मधील बंदिस्त गटार व रस्ता काँक्रीटीकरण, तेली आळी येथील रस्ता काँक्रीटीकरण, खंडोबा माळ रस्ता काँक्रीटीकरण, आणि भावबंधे शेजारील गल्ली रस्ता काँक्रीटीकरण या कामांचे भूमीपूजन आणि पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. या सर्व कामांसाठी एकूण एक कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून निधी नागरी दलित वस्ती सुधारणा, जिल्हा वार्षिक योजना आणि नागरी सेवा सुविधा योजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांच्या आत कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधीक्षक राम सरगर यांनी दिली.





