Maval Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू झाली असून, त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नुकतेच पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि सर्व पक्षीय अपक्ष बापू भेगडे यांच्यासह सहा उमेदवार नशीब आजमावत आहेत. या मतदार संघात २,८०,३१९ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. याठिकाणी १७ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून २९ फेऱ्या होणार आहेत. या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील अंतिम निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येईल असे निवडणूक प्रशासनाने सांगितले. उमेदवारांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे समर्थक असलेल्या बापूसाहेब भेगडे हे (अपक्ष) म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने महायुतीकडून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं? सुनील शेळके यांना 2019च्या निवडणुकीमध्ये 167712 इतकी मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांना 73770 इतकी मतं मिळाली होती. मावळमध्ये मतमोजणी सुरु : महायुती – सुनील शेळके – आघाडी – 41655 अपक्ष – बापूसाहेब भेगडे – पिछाडी – 16739 सुनील शेळके – 24916 मतांची आघाडी मावळ मतदारसंघात सतराव्या फेरीअखेरीस अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी 1 लाख 17 हजार 905 मतांसह आघाडी घेतली आहे. अजित पवार गटाचे सुनील शेळके 72,836 मतांनी आघाडीवर आहेत. सतरावी फेरी : 166085 मतं सुनील शेळके (अजित पवार गट) : 117905 मतं बापू भेगडे (अपक्ष) : 45069 मतं