मौनी अमावस्येचे महत्त्व काय आहे? ; शाही स्नान का आहे खास ? वाचा सविस्तर

Mauni Amavasya । उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी हे पवित्र स्नान करण्याची प्रथा आहे. याच पवित्र दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी माघ अमावास्या म्हणजेच मौनी अमावास्या २९ जानेवारी रोजी आहे. मौनी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तारीख आहे. मौनी या शब्दाचा अर्थ मौन आहे, म्हणजेच शांत राहण्याशी संबंधित. हा दिवस मौन आणि आत्मनिरीक्षणासाठी खास मानला जातो. मौनी अमावस्येच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने पापांची क्षमा होते अशी श्रद्धा आहे. याच मौनी अमावस्येबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मौनी अमावस्येचे महत्त्व Mauni Amavasya ।
मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. याने तर्पण करणाऱ्यांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी नदीकाठी जाऊन पूर्वजांना प्रार्थना आणि दान देऊन कुंडलीतील दोषांपासून मुक्तता मिळवता येते. याशिवाय, या दिवशी मौन व्रत केल्याने वाक् सिद्धि प्राप्त होण्यास मदत होते. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन व्रताचा अर्थ स्वतःमध्ये डोकावणे, ध्यान करणे आणि देवाच्या भक्तीत हरवून जाणे असा आहे.
मौनी अमावस्या का खास आहे? Mauni Amavasya ।
आध्यात्मिक शुद्धीकरण: या दिवशी मौन बाळगल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्मनिरीक्षण करण्याची संधी मिळते.
पवित्र स्नान: या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः प्रयागराजमधील संगमावर स्नान करण्याचे महत्त्व जास्त आहे.
दान आणि पुण्य: या दिवशी दान केल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते. अन्न, कपडे, पैसे देणे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्य मानले जाते.
ध्यान आणि योग: मौनी अमावस्या हा ध्यान, साधना आणि योगासाठी देखील चांगला काळ आहे.
मौनी अमावस्येला शाही स्नान होणार
मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभाची तिसरी शाही देखील असतो. या दिवशी होणारे शाही स्नान खूप फायदेशीर मानले जाते. या दिवशी अनेक शुभ योगायोगही घडतील. या दिवशी चंद्र, सूर्य आणि बुध मकर राशीत त्रिवेणी युती करतील. या शुभ योगायोगांमध्ये, जेव्हा भक्त पवित्र नदीत श्रद्धेचे स्नान करतो तेव्हा त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि आत्मा शुद्ध होतो.





