‘Etha’ and ‘Matrubhumi’ Box Office Clash : मातृभूमी आणि ईठा एकाच दिवशी रिलीज होणार; पहिल्या दिवशी कोण मारणार बाजी?
'Etha' and 'Matrubhumi' Box Office Clash : ‘मातृभूमी’ चित्रपटाची कथा भारत-चीन संबंध आणि गलवान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून हा एक युद्धपट आहे. या विषयावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी विशिष्ट प्रेक्षकवर्ग लाभतो.

‘Etha’ and ‘Matrubhumi’ Box Office Clash : ‘सिकंदर’ चित्रपटाच्या अपयशानंतर आता सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक कारणांमुळे प्रदर्शन लांबणीवर पडलेला हा युद्धपट अखेर ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट टक्कर श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी कोणता चित्रपट अधिक कमाई करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मातृभूमी’ चित्रपटाची कथा भारत-चीन संबंध आणि गलवान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून हा एक युद्धपट आहे. या विषयावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी विशिष्ट प्रेक्षकवर्ग लाभतो. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीबाबत सध्या फार मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या नाहीत.
या चित्रपटासाठी सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे सलमान खान. अलीकडच्या काळात त्याच्या काही चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी सलमानची लोकप्रियता आणि चाहत्यांमधील क्रेझ कायम आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘मातृभूमी’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५ ते ८ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. अर्थात प्रत्यक्ष कमाईचे आकडे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होतील.
श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चीही बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात होणार
दुसरीकडे, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या चित्रपटाकडूनही चांगल्या कमाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र ही बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ असल्याने या चित्रपटाला त्याचा फायदा मिळू शकतो.
या चित्रपटात श्रद्धा कपूर प्रसिद्ध लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘स्त्री २’च्या यशानंतर श्रद्धाच्या या भूमिकेकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या दिवशी चांगली कमाई चित्रपट करू शकतो.
स्क्रिन वाटपाचा मुद्दा महत्वाचा
दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने थिएटर्समधील स्क्रीनवाटप हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. उत्तर भारतातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सलमान खानच्या ‘मातृभूमी’ला अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य भारतातील मल्टिप्लेक्समध्ये ‘ईठा’ला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.





