Govinda and Komal Rani: ‘प्री-वेडिंग फोटोशूट करताय की सिनेमाचं प्रमोशन?’ गोविंदा-कोमलचे फोटो पाहून नेटकरी भडकले
Govinda and Komal Rani कोमल राणी स्वर्णकार हिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गोविंदासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत असून काही फोटो रोमँटिक अंदाजातील आहेत. ही पोस्ट शेअर करताना कोमलने 'रूपाची सुंदर झलक' असे कॅप्शन दिले आहे. हे फोटो त्यांच्या आगामी ‘रुपा’ चित्रपटाशी संबंधित असल्याचे समजते.

Govinda and Komal Rani: बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. आता तो ‘रुपा’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याच्या कामापेक्षा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. गोविंदा आणि कोमल यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता कोमलने गोविंदासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Govinda and Komal Rani
गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
कोमल राणी स्वर्णकार हिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गोविंदासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत असून काही फोटो रोमँटिक अंदाजातील आहेत. ही पोस्ट शेअर करताना कोमलने ‘रूपाची सुंदर झलक’ असे कॅप्शन दिले आहे. हे फोटो त्यांच्या आगामी ‘रुपा’ चित्रपटाशी संबंधित असल्याचे समजते.
मात्र, कोमलची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही चाहत्यांना दोघांचे फोटो आवडले, तर अनेकांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रमोशनपेक्षा दोघांच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा अधिक होत असल्याने नेटकऱ्यांनी कमेंट्समधून प्रश्न उपस्थित केले आहेत.

Govinda and Komal Rani
‘प्री-वेडिंग फोटोशूट आहे की सिनेमाचं शूट?’
गोविंदा आणि कोमलच्या फोटोंवर कमेंट करताना अनेकांनी त्यांच्या जवळिकीवरून टोमणे मारले आहेत. एका नेटकऱ्याने ‘हे प्री-वेडिंग फोटोशूट आहे की सिनेमाचं शूट?’ असा सवाल केला आहे. तर दुसऱ्याने ‘सिनेमा प्रदर्शित होणार आहे की नाही?’ अशी कमेंट केली आहे. काही नेटकऱ्यांनी ‘शुगर डॅडी’ अशा शब्दांतही प्रतिक्रिया दिली आहे.

Govinda and Komal Rani
या कमेंट्समुळे कोमलच्या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या फोटोंवर केवळ सामान्य नेटकऱ्यांनीच नव्हे, तर बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंत हिनेही प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त आहे. राखीच्या कमेंटचीही सध्या चर्चा होत आहे.

Govinda and Komal Rani
सुनीता आहुजाच्या वक्तव्यामुळे आधीच चर्चांना उधाण
गोविंदा आणि कोमल यांच्या चर्चांमध्ये गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिच्या वक्तव्यांचीही भर पडली आहे. यापूर्वी सुनीताने गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच कोमल या नावाचा तिरस्कार असल्याचे वक्तव्य केल्याचीही चर्चा झाली होती. त्यामुळे गोविंदा आणि कोमल यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी हवा मिळाली.
याशिवाय गोविंदाला विमानतळावर आणि मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कोमलसोबत पाहण्यात आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले.

Govinda and Komal Rani
गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातही चर्चांना उधाण
दुसरीकडे, गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहेत. सुनीताने यापूर्वी गोविंदाबद्दल अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमीही समोर आली होती. मात्र, नंतर हा अर्ज मागे घेतल्याचे वृत्त आले. सध्या गोविंदा आपल्या कुटुंबासोबत राहत नसल्याच्या चर्चाही प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत. मात्र, या सगळ्या चर्चांवर गोविंदाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे गोविंदा ‘रुपा’ चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो सतत चर्चेत आहे. आता या सगळ्या चर्चांचा चित्रपटाच्या प्रमोशनवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





