Nagar | माथाडी मंडळ हे कामगारांचे सुरक्षा कवच : अविनाश घुले

नगर, (प्रतिनिधी) – स्व.शंकरराव घुले माथाडी पतसंस्थेच्या वतीने माथाडी कामगार आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पतसंस्थेच्यावतीने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या मुलांना शिक्षणांमध्ये कोणतीही अडचण भासणार नाही, असे त्यांनी करुन दाखविले आहे.
संघटना कामगारांनासाठी झटत असते. माथाडी मंडळ हे कामगारांचे सुरक्षा कवच आहे. जिथे जिथे कामगारांना काम करत असताना अडचड निर्माण होते,
तेथे तेथे पतसंस्था व हमाल पंचायत नेहमीच धावुन जात असल्याचे, प्रतिपादन हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
स्व.शंकरराव घुले माथडी कामगार सहकारी पतसंस्थेच्यावतीने नोंदीत माथाडी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते झाले.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, उपध्यक्ष नवनाथ बडे, हमाल पंचायत उपाध्यक्ष गोंविद सांगळे, सचिव मधुकर केकाण, अदिनाथ चेके, संजय घुले,
लक्ष्मण वायभासे, सागर पोळ, रत्नाबाई आजबे, मंदा सुर्यवंशी, सचिव संजय महापुरे, सचिन ठुबे, बहिरु कोतकर, विलास कराळे, मछिंद्र गिरी आदी उपस्थित होते.
अविनाश घुले म्हणाले, जे माथाडी कामगार नोंदीत असून माथडी बोर्ड मध्ये नियमितपणे पगार भरतात त्यांच्याच पाल्यांसाठी हि योजना लागू करण्यात आली आहे.
तेव्हा कामगारांनी कोणताही धोका पत्कारु नये, जेणे करुन त्यांच्या उज्वल भविष्याच्या फायद्यासाठी माथाडी मंडळमध्ये पगार वेळच्या वेळी भरत जावे,
आज जे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यातुन ते निश्चितच अभ्यास करुन भविष्य उज्वल करतील, असे ते म्हणाले.



