पुणे | माळीण गावाला शैक्षणिक साहित्य वाटप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येवून ठेपला आहे. सर्वत्र गणेश मंडप उभारण्याची तयारी सुरू आहे. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने आपले वेगळेपण जपत माळीण गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत मंडप उभारणी सुरू केली आहे.
साल २०१४ साली पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर कोसळलेल्या आपत्तीवर मात करून आज त्या गावातील मुले शिक्षण घेत आहेत. पण खूप सारी मदत मिळून देखील शैक्षणिक साहित्यासाठी अजूनही त्यांचा शोध सुरूच होता.
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री कसबा गणपती सार्वजनिक संस्था आणि रमणबाग युवा मंच ट्रस्ट पुणे यांनी पुढाकार घेत मंडप मुहूर्ताच्या प्रसंगी वेळेस माळीण गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम श्री कसबा गणपती मंदिरामध्ये पार पडला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, उपाध्यक्ष सूरज गाढवे, सचिव दीपा तावरे, सहसचिव अक्षय ढेरे, कोषाध्यक्ष भूषण रुपदे, सह कोषाध्यक्ष ऋग्वेद निरगुडकर, सह कोषाध्यक्ष आशुतोष शेरे, कार्याध्यक्ष निलेश वकील, स्वागताध्यक्ष मंदार देशपांडे आदी उपस्थित होते.



