“एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते…” मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रशांत दामलेंसाठी केली खास पोस्ट

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता आणि नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी अभिनयामध्ये नवी उंची गाठली आहे. दामले यांनी नुकताच १२ हजार ५०० वा नाटकाचा प्रयोग केला आणि एक अनोखे रेकॉर्ड आपल्या नावे केले. यानंतर प्रशांत दामले यांच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील प्रशांत दामले यांचे या विक्रमाबद्दल कौतुक केले.
दामलेंनी केलेल्या विक्रमाबद्दल सचिन तेंडुलकरने देखील एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये सचिन म्हणतो,मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा १२,५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”.
मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा १२५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा pic.twitter.com/qpSPwwuThx
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 6, 2022
षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामले यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार देखील पार पडला. यावेळी सर्वांनी त्यांना या नव्या विक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. सचिनने एका मराठमोळ्या कलाकाराला दिलेल्या शुभेच्छा चांगल्याच लक्षवेधी ठरत आहेत. स्वतः प्रशांत दामले यांनी ही पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत.





