अभिनेते प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार प्रदान

Updated On:

मुंबई – अभिनेते प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्काराने गौरवण्यात आलं. गुरुवारी (दि.२३) रोजी हा सन्मान सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दामले यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

अभिनेते प्रशांत दामले यांच्या नावावर रंगकर्मी आणि अभिनेता म्हणून अनेक विक्रम आहेत. तीन दशकांहून अधिक काळ प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नाटक,चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये दामले यांनी अभिनय साकारलेला आहे. यासोबतच प्रशांत दामले यांचा नाटकातील चाहता वर्ग देखील मोठा आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते [पुरस्कार मिळाल्यानंतर प्रशांत दामले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जॅमध्ये ते म्हणतात,”हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे.”

आणखी संबंधित बातम्या

Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती

2026-07-30 22:30:15

Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती

R. Madhavan : "माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आली"; आर. माधवनने पद्मश्री पुरस्कार मिळताच मानले आभार

2026-06-24 10:41:48

R. Madhavan : "माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आली"; आर. माधवनने पद्मश्री पुरस्कार मिळताच मानले आभार

Punit Balan : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड

2026-06-22 16:27:06

Punit Balan : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड

Dehradun News : डेहराडूनच्या सैन्य अकादमीने रचला इतिहास! प्रथमच मिळाल्या 9 महिला लष्करी अधिकारी

2026-06-13 17:07:00

Dehradun News : डेहराडूनच्या सैन्य अकादमीने रचला इतिहास! प्रथमच मिळाल्या 9 महिला लष्करी अधिकारी

Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बनणार जेडीयूचे अध्यक्ष; पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता

2026-03-20 21:11:53

Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा बनणार जेडीयूचे अध्यक्ष; पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता