अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे असलेल्या सेंट्रल बँकेला कामकाज सुरु असताना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीत बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत. दरम्यान, सर्व कर्मचारी घाबरून बँके बाहेर पडल्याने या घटनेत सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही. मात्र या घटणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अचानक लागलेल्या या घटनेने बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. तर घटनेची माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र आग विझत नसल्याने धामणगाव आणि तीवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले. बँकेला अचानक आग लागल्याचे दिसताच नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. पुण्यातील वानवडी येथील सेक्रेड वर्ल्ड इमारतीला भीषण आग – तथापि, शनिवारी वानवडी येथील जगताप चौकातील सेक्रेड वर्ल्ड इमारतीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग लागली. आग वेगाने पसरली, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताचं घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. डोंगराला लागेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू अंब्रुळकरवाडी- भोसगांव येथे डोंगराला लागेल्या वणव्यात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. आंब्याची बाग वाचवताना ही घटना घडली आहे. तुकाराम सिताराम सावंत असं मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते 64 वयाचे होते. आग विझविण्यासाठी गेलेले असताना त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या वणव्यात 100 ते 150 झाडांची आंब्याची बाग देखील जळून खाक झाली आहेत