उत्तरप्रदेशात एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; चार ठार
Updated On:

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात शनिवारी सकाळी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा, आणि एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला.
आरती (40), कुंदन (11), आंचल (12) आणि तृप्ती (11 महिने) अशी मृतांची नावे आहेत.डुमरी गावात, एक महिला स्वयंपाकघरात सकाळी चहा करण्यासाठी गेली असता त्यावेळी अचानक या सिलींडरचा स्फोट होऊन ही भीषण घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.या कुटुंबातील कर्ता पुरूष मात्र बाहेर गेल्याने बचावला आहे.





