सोलापूरातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट

Solapur । बार्शीतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे परिसर हादरला आहे. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. आज वटपोर्णिमा असल्यामुळे या कारखान्यातील सर्व महिलांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे आज वटपोर्णिमा असल्यामुळे जिवितहानी झाली नाही.
जर त्या महिला कारखान्यात असत्या तर भीषण प्रसंग ओढावला असता. मिळालेल्या माहितीनुसार, घारी गावातील फटाका कारखान्यात ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे.
आज सकाळी कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते. हा स्फोट इतक भीषण होता की, आजूबाजूतील परिसराला हादरा बसला. स्फोट झालेल्या त्या फटाका कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. परंतु शुक्रवारी वटपौर्णिमा होती. त्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. कोणतीही महिला कामाला गेली नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग कशामुळे लागली, ते अजून समोर आले नाही.





