शिक्रापूर, (वार्ताहर)- शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे नागरिकांना दर्शन होऊन अनेक नागरिक व पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत आहे. शिरुर वनविभागाने पुढाकार घेऊन मानव व बिबट संघर्ष रोखण्यासाठी उपक्रम हाती घेत शिरुर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये बिबट जनजागृती मोहीम सुरु केली आहे. शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने नागरिकांवर हल्ले केल्याने काही नागरिकांचा मृत्यू होऊन कित्येक ठिकाणी पशुधनवार बिबट्याने हल्ले करीत ठार केल्याचे समोर आलेले आहे. बिबट व मानव यांच्यातील संघर्ष कमी करणे गरजेचे असल्याने शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गौरी हिंगणे व गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चव्हाण, संतोष भुतेकर, नारायण राठोड, लहू केसकर, चालक अभिजित सातपुते, शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे हनुमंत कारकुड, महेंद्र दाते, नवनाथ गांधीले, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, जयेश टेमकर, अविनाश सोनवणे, शुभम वाघ, रोहित येवले, शुभम शिस्तार, सुदर्शन खराडे, श्रेयस उचाळे, शौकत शेख, ऋषिकेश विधाटे, शरद रासकर यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शाळांमध्ये बिबट्यापासून संरक्षणाबाबतच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थी व शिक्षकांना दिली. यावेळी जनजागृती मोहीम सुरु केली असून विद्यार्थ्यांना घ्यावयाची काळजी व खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.