“मलाही मारलं असतं तर…”; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू ; ढसाढसा रडला दहशतवादी मसूद अझहर

Masood Azhar on ‘Operation Sindoor’। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. दहशतवादी मसूद अझहरने एक पत्र जारी करून, त्यालाही या हल्ल्यात मारलं असतं तर बरं झालं असतं” असे म्हटले आहे.
पंजाबमधील ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणी हल्ले Masood Azhar on ‘Operation Sindoor’।
पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीणही ठार झाली आहे. या हल्ल्यांमध्ये घोषित दहशतवादी यांचे नातेवाईकही मारले गेले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाबमधील ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणी हल्ले करण्यात आले.
मसूद अझहरच्या कुटुंबावर आज अंत्यसंस्कार Masood Azhar on ‘Operation Sindoor’।
जैश-ए-मोहम्मदने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की मौलाना मसूद अझहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातवंडे. बाजी सादिया यांचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत. दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्यांना आज बुधवारी (०७ मे २०२५) दफन करण्यात येईल.
जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचा हवाला देत बीबीसी उर्दूने वृत्त दिले आहे की,अझहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारी देखील भारतीय हल्ल्यात मारले गेले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमधील सुभान अल्लाह कंपाऊंडवरही हल्ला करण्यात आला.





