पुणे जिल्हा | छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळोची, (वार्ताहर)- लग्न झाल्यापासून सातत्याने माहेर होऊन हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा छळ होत असल्याने विवाहितेने आत्महत्या केली. यापकरणी विवाहितेस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी शुभम अशोक पवार, लिलाबाई अशोक पवार, अशोक श्रीपती पवार, अक्षय अशोक पवार (सर्व रा. मौजे बारामती ता. बारामती) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेचा भाऊ विक्रांत विजय तागडकर याने फिर्याद दिली होती.
21 वर्षीय नंदिनी शुभम पवार हिने दि. 28 मे रोजी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे अशोक श्रीपती पवार, दीर अक्षय अशोक पवार यानी वारंवार शिवीगाळ, दमदाटी करुन आमचा लग्नामध्ये मानपान केला नाही, माहेरहून पाच लाख रुपये आण, दोन तोळे सोने आण,
असे म्हणून तिला मारहाण करून तिचा वारंवार मानसिक व शारीरीक छळ केला, तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, फिर्यादीवरून पोलिसांनी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहे.





