नागा चैतन्य-शोभिता धुलीपालाने बांधली लग्नगाठ; दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding | दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांच्या लग्नाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर हे दोघे 4 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पारंपरिक थाटात दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नागा चैतन्यचे आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांनी स्थापन केलेल्या हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांचा विवाह सोहळा झाला.
गेल्या आठवडाभरापासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे विधी सुरू होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटोही समोर आले होते. लग्नाच्या विधींचे फोटो समोर आल्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
लग्नसोहळ्यात नागा आणि शोभिताने पारंपरिक साज परिधान केला होता. शोभिता साउथ इंडियन साडीत खूप सुंदर दिसत होती. तिने गोल्डन रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. त्यासोबत साजेश्या दागिन्यांचा श्रृंगार केला होता. तर नागा चैतन्यने पांढरा कुर्ता परिधान केला होता. दोघांच्या लूकला चाहत्यांनी पसंती दिली असून त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. या जोडप्याने दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.
नागा चैतन्यने शोभितापूर्वी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. या दोघांचे लग्न 2017 मध्ये झाले होते. पण, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विभक्त होण्याची घोषणा केली होती आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. घटस्फोटानंतर काही वेळातच नागा चैतन्यच्या शोभितासोबतच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आणि त्याने यावर्षी ऑगस्ट 2024 मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला.
हेही वाचा:
Salman Khan : Y+ सुरक्षा भेदत सलमानच्या ‘शुटिंग’दरम्यान अज्ञात व्यक्ती सेटवर आला अन्…;





