Shehnaaz Gill | ‘बिग बॉस 13’मधून अभिनेत्री शहनाज गिलला मोठी लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यातील केमिस्ट्री खूप गाजली. मात्र, सिद्धार्थच्या अकाली निधनाने शहनाझला मोठा भावनिक धक्का बसला. यातून सावरत शहनाज मोठ्या पडद्यावर दमदाररित्या काम करत आहे. नुकतेच तिने ‘इक कुडी’ च्या प्रमोशन दरम्यान लग्न या विषयावर आपले स्पष्ट मत मांडले. चित्रपटाच्या निमित्त एका मुलाखतीत शहनाझला आजच्या काळात लग्न आवश्यक आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शहनाजने अत्यंत स्पष्ट उत्तर दिले. ती म्हणाली, “लग्न आवश्यक नाही. जर तुम्हाला लग्न करायचे नसेल तर ते ठीक आहे. लोक लग्न करतात, तेही ठीक आहे. जरी मला वाटत असले की मी लग्न करणार नाही, तरी मी कधीही करणार नाही असे मी म्हणू शकत नाही. मला उद्या लग्न करावे लागू शकते. मला स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल”. Shehnaaz Gill | पुढे शहनाज म्हणाली की, “लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचे नाही. तर दोन कुटुंबाचे नाते आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे घर सोडल्यानंतर एका मुलाला तुमचे संपूर्ण आयुष्य देता. तुम्ही त्याच्यासाठी सर्व काही करता, हा एक मोठा निर्णय आहे. तुमचा जोडीदार कोण असेल हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून तुम्ही व्यस्थितरित्या निर्णय घेतला पाहिजे. ” Shehnaaz Gill | शहनाजच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०१५ मध्ये तिने ‘शिव दी किताब’ या म्युझिक व्हिडीओने तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तिने २०१७ मध्ये ‘सत श्री अकाल इंग्लंड’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केले. तिने ‘हौसला रख’, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘थँक्यू फॉर कमिंग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता शहनाजचा ‘इक कुडी’ चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून शहनाज गिलने निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘इक कुडी’ चे दिग्दर्शन अमरजीत सिंह सरोन यांनी केले आहे. Shehnaaz Gill | हेही वाचा: Crime News : चांडोहमध्ये महिलेस शिवीगाळ करून मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल