Mardani 3 Box Office : अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला मर्दानी ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. पहिला विकेंट संपूण आता दुसऱ्या आठवड्यात मर्दानी ३ ने एन्ट्री केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सोमवारी ‘मर्दानी ३’ ने १.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर मंगळवारी चित्रपटाने अंदाजे १.५० कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे रिलीजच्या १२ व्या दिवशी ‘मर्दानी ३’ ने बॅाक्स अॅाफिस कलेक्शनच्या बाबतीत वेग घेतला आहे. त्यामुळे ‘मर्दानी ३’ चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ४० कोटी रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. मर्दानीच्या तिसऱ्या भागाला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जीने पटकला. आता त्यानंतर ती थेट ‘मर्दानी ३’ मध्ये झळकली असून तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचे कौतुक प्रेक्षक करत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की, यशराज फिल्म्स बॅनरखाली निर्मित केलेल्या ‘मर्दानी ३’ चे बजेट अंदाजे ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आधीच लक्षणीय व्यवसाय केला आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट तिचे गुंतवणुकीची किंमत वसूल करणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या आकर्षक कथानकासह चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्यामुळे हा चित्रपट आगामी काळात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात राणी मुखर्जीचे आणखी काही चित्रपट येणार असल्याचे सांगितले जात आहेत. हेही वाचा : Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल अंबानींसह पत्नीला बजवाले समन्स