मराठमोळ्या अभिनेत्रीचे ऑस्ट्रेलियात पतीसोबत होळी सेलिब्रेशन

Neha Gadre Holi Celebration| छोट्या पडद्यावरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमुळे अभिनेत्री नेहा गद्रेला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र या मालिकेनंतर ती फार अभिनय क्षेत्रात पाहायला मिळाली नाही. लग्नानंतर नेहाने अभियन सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याच निर्णय घेतला. मात्र सोशल मिडियाच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच नेहाने होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
परदेशी स्थायिक झालेली नेहा अद्याप आपली मूळ संस्कृती विसरलेली नाही. ऑस्ट्रेलियात राहूनही ती दिवाळी, दसरा, गणेशोत्सव यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरी करते. आता तिने ऑस्ट्रेलियात आपल्या नवऱ्यासह होळी साजरी केली आहे. ज्याबाबतचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात दोघेही बॉलीवूड गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
दरम्यान, स्टार प्रवाह वरील मन उधान वाऱ्याचे या मालिकेत नेहाने गौरीची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकेतही काम केले. तर ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने 2 मार्च 2019 ईशान बापटशी विवाह केला आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे.
हेही वाचा:
प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ निर्णयावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले “…हे दुर्दैव”





